नागपूर, दि.२६ : जिल्हाधिकारी कार्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी भारतीय ध्वजास मानवंदना दिली. पोलीस विभागाच्या बँड पथकाने यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.




