आपला माणूस फाउंडेशन, नागपूर तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार सोहळा आणि अधिकृत संकेतस्थळाचे थाटात उद्घाटन
नागपूर, २५ जानेवारी २०२६:आज ‘आपला माणूस फाउंडेशन’ नागपूरच्या वतीने एका भव्य दिव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला, तसेच फाउंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळाचे (Website) उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
मान्यवरांची उपस्थिती:
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध लेखक व वक्ते श्री. अमोल पुसदकर सर यांच्या हस्ते झाले. प्रमुख अतिथी म्हणून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल वर्कचे डॉ. अनिल सरगर सर, जानकी नगर महिला मंडळाच्या हरणे ताई, मंगला ताई खेकरे, मनीषा ताई नगरधनकर आणि बाबारावजी तायडे काका यांची विशेष उपस्थिती होती.
भाजप पदाधिकाऱ्यांचा सहभाग:
यावेळी वॉर्ड अध्यक्ष मनीषा ताई भुजाडे, संगीता ताई ठाकरे यांच्यासह भाजपचे इतर अनेक पदाधिकारी उपस्थित होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत जोशी सर, ओमभाऊ झाडे, कमलाकर कुमरे, आरती रहांगडाले, आशिषभाऊ आमलीकवार आणि वैशाली झाडे ताई यांनी केले.
कृतज्ञता आणि आभार:
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल ‘आपला माणूस फाउंडेशन’चे सचिव गगन ऊर्फ राहुल राधा केशव रहांगडाले यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी आपल्या भाषणात विशेषतः अवधूत नगर नं. २ च्या सर्व नागरिकांचे आभार मानले, ज्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
तसेच, सर्व मीडिया प्रतिनिधी, फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, साऊंड डिझायनर, मंडप डेकोरेशनचे नितीनभाऊ आणि चविष्ट भोजनाची व्यवस्था करणारे खानसामे व त्यांच्या टीमचेही आभार मानण्यात आले. कार्यक्रमात सर्व प्रमुख पाहुण्यांचा ‘ट्रॉफी, शाल आणि बुके’ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व नागरिक आणि पाहुण्यांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.
संपर्क:
राहुल (गगन) रहांगडाले (सचिव, आपला माणूस फाउंडेशन, नागपूर)
मोबाईल: ९३२२६३६२६६




