नागपूर मौदा

शालेय विद्यार्थ्यांना मौदा पोलिसांकडून वाहतूक नियमांचे ‘धडे’

हेल्मेट वापराबाबत जागृती ,मौदा वाहतूक पोलिस शाखेचा उपक्रम

मौदा प्रतिनिधी: शालेय विद्यार्थांनी जबाबदार व चांगला नागरिक बनावे या उद्देशाने मौदा पोलिसांकडून पोलिस स्टेशन येथे विशेष मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मौदा पोलिस स्टेशन येथे मौदा शहरातील शिर्डी साई पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांना पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे यांनी वाहतूक नियमांबाबत माहिती देण्यासह व्यसनाधिनतेपासून दूर राहणे, सायबर गुन्हेगारी, सोशल मीडियाचा वापर आदी विषयांवर मार्गदर्शन केले,

या कार्यक्रमादरम्यान मौदा वाहतूक पोलिस शाखेने विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देत नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे व वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी यांच्या चमूने पार पडलेल्या कार्यक्रमादरम्यान वाहतूक नियमांबाबत माहिती देताना विभागातील कर्मचाऱ्यांनी दुचाकी चालवताना हेल्मेटचा नियमित वापर करण्याचे आवाहन केले. वाहन चालवताना मोबाईलवर बोलू नये, ट्रिपल सीट दुचाकी चालवू नये, दारू पिऊन दुचाकी चालवू नये, असे मार्गदर्शन केले. विशेषतः अल्पवयीनांनी वाहन चालवण्याचे दुष्परिणाम, त्यावर करावयाची कारवाई याबाबत माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल किटे, वाहतूक पोलीस शिपाई अतुल निंबार्ते, शुभम ईश्वरकर पोलिस स्टेशन येथील कर्मचारी व शाळेतील शिक्षक शिक्षिका व आदी कर्मचारी उपस्थित होते,

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदे विषयक तसेच वाहतूक शिस्तीबाबत जागरूकता निर्माण होत आहे. हा उपक्रम विविध पुढे विविध शाळांमध्ये राबविला जाणार असून त्यामुळे भविष्यात जबाबदार नागरिक घडण्यास मदत होईल.
अतुल निंबार्ते
वाहतूक पोलीस शिपाई पोलिस स्टेशन मौदा

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *