नागपूर, दि. २३ : देशभर राष्ट्रीय मतदार दिन २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो. या मतदार दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आज कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी प्रवीण महीरे यांनी उपस्थितांना मतदार दिनाची शपथ दिली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
२५ जानेवारी १९५० रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. २०११ पासून भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी २५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे.




