पंढरपूर, दि. २३ प्रतिनिधी:आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर प्रत्येक प्रमाणे विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळा संपन्न झाला. विठ्ठल भक्त पुरुष आणि महिलांनी या विवाह सोहळ्यास हजेरी लावली. विठ्ठल मंदिर आणि परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाला.
विवाह विधींसाठी विठ्ठल मंडपात खास सजावट करण्यात आली होती, सोहळ्यासाठी येणाऱ्या वऱ्हाडी भाविकांसाठी पंचपक्वान्नांचे भोजन आयोजित करण्यात आले . खास विवाह सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच राज्यातील विविध भागातून महिला भाविक मंदिरामध्ये दाखल झालेले आणि या विवाह सोहळ्यामध्ये संपूर्ण पंढरपूर आणि मंदिर परिसरामध्ये एक मंगलमय वातावरण तयार झाले.




