भिवापूर ( राजेश जांभुळे )सावित्रीबाई फुले यांच्या जयंती व राष्ट्रीय शिक्षक दिवसा निमीत्य सत्कार सोहळ्याचे आयोजन मोमेंट ट्वेटीवन यांच्या वतिने करण्यात आले होते. यात कर्तत्वान अंगणवाडी शिक्षिकेचा सत्कार सावित्रीबाई फुले यांच्या जिवनावरील पुस्तक व दर्पण विशेषांक, डायरी व पुष्पगुच्छ देवून मान्यवराच्या हस्ते थाटात सत्कार करण्यात आला.
भिवापूर एज्युकेशन हॉयस्कुलच्या भव्य प्रांगणात या सोहळ्याचे खास आयोजन करण्यात आले होते. अतिथी म्हणून माविमच्या अध्यक्ष सौ.निलिमा नागोसे, नगरसेवक कांचन बालपांडे, मोमेंट ट्वेंटीवन च्या स्नेहा गजभिये, नितीन पाटील, जीवन गजभिये, मुख्याध्यापक वैभव समर्थ उपस्थित होते. प्रारंभी मान्यवराच्या हस्ते महात्मा जोतीबा फुले व सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
संस्थेच्या माजी विद्यार्थीनी हभप शुभांगी डवले यांनी आपल्या मनोदयात आईची चांगली मैत्रीण बना तसेच आजुबाजुला घडलेल्या गोष्टी घरी सांगावे असे विचार मांडले. यावेळी निलिमा नागोसे यांनी विविध महिला बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रम बाबत माहिती दिली. यावेळी सावित्रीबाई फुले चा जिवन प्रवास शिक्षक घनश्याम बन्सोड दिग्दर्शीत नाटिका सादर करण्यात आली. यात करण ठाकरे व कु. रिना चौधरी या विद्यार्थ्यांनी प्रमुख भुमिका साकारल्या. कार्यक्रमाचे संचालन कविता येंडे यांनी केले. यावेळी मोठया प्रमाणात शालेय विद्यार्थाची उपस्थिती होती.




