नागपूर जिल्हा भिवापुर

निसर्गरम्य माँ रानाई माता देवस्थान

राजेश जांभुळे,  महासागर:भिवापूर पासून सात किमी अंतरावर असलेल्या पवनी तालुक्यात येणाऱ्या रानाळा हे निसर्गरम्य पर्यटन सहलीचे केंद्र व रानाई माता परिसरतील भाविकांचे श्रध्देचे स्थान आहे. परंतु हे ठिकाण उमरेड – कऱ्हांडला अभयरण्यात येत असल्याने येथे ये -जा करण्यास वनविभागाची मनाई आहे. परंतु शारदीय व चैत्र नवरात्रोत्सवात भाविकांची दर्शनासाठी एकच गर्दी पहावयास मिळते.

रनाला म्हणून सर्वदूर परिचित असलेला या परिसराची नोंद राजस्व व वनविभागाच्या दप्तरी जोगीखेडा (हमेशी ) या रिठी गावाच्या नावाने आहे. सदर स्थळ वनविभागाच्या अतर्गत येत असल्याने येथे वन्य प्राण्याचा वावर असल्याने हे पर्यटन स्थळ उपेक्षित होते. परंतु रानाई मातेची जागृत स्थळ बघता काही भाविकांनी एकत्र २०१८ ला रानाई माता बहुउद्देशीय सेवा समिती जोगीखेडा ( आमगाव ) ता. पवनी या नावाने ट्रस्ट ची नोंदणी केली असून या माध्यमातून देवस्थानाचा कारभार चालतो.

पुर्वी रानाई मातेची झाडाखाली मुर्ती होती. आता देवस्थान कमेटीच्या वतीने भव्य मंदिराचे स्वरूप देण्यात आले आहे. लगतच अनेक देव देवतांच्या दगडी मुर्ती आहेत. परिसरात काही हेक्टर सरकारी तर काही मालगुजारी जंगल आहे. परिसरात सागाचे वनिकरण झाले असून जागोजागी बांबूंची गर्द बेटे दृष्टिस पडतात. आजूबाजूला हिरव्या नटलेल्या टेकड्या आणि मध्यभागी असलेले विस्तुत जलाशय आकर्षून घेते. लगतच डॉ. भिवापूरकर यांची वाडी असून आंब्यांचे झाड, चिकू, पेरू, खिरणी चे झाडे होती. रानाळा हे एकेकाळी घनदाट अरण्य होते.

जागृत देवस्थान !

मरू नदीच्या काठावर जोगीखेडा हे ठिकाण आहे. पुर्वकडे माँ रानाई मातेचे जागृत पुरातन स्थान आहे. नवसाला पावणारी माँ रानाई मातेची अशी ओळख आहे. लगतच असलेला निर्सग रम्य सुंदर तलावातून स्वयपांक करण्याची पितळीची भांडी मिळायची. कुणीतरी विचित्र प्रकार केल्यामुळे आता भांडे येणे बंद झाले आहे. अशी आख्यायिका आहे. माँ रानाई मातेच्या पायथ्याच्या तलावाच्या पुर्वेला राजकोट आहे. त्या ठिकाणी पूर्वीचे राजे शिकारी करीता येवून वास्तव करायचे. या तलावाच्या पाण्यात औषधी गुणधर्म असल्याने त्याचा उपयोग शेतातील पिकांवर शिपंडण्यासाठी परिसरातील शेतकरी वर्ग करीत असतात.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *