पुणे, दि.२८। प्रतिनिधी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत निर्माण केलेल्या घरांचे लोकार्पण पुणे येथे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकताच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मंगळवार, एक ऑगस्ट रोजी नरेंद्र मोदी पुणे येथे येणार आहेत. यावेळी महापालिकेने आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी वडगाव खुर्द, खराडी, हडपसर येथे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या २६५८ घरांचे लोकार्पण, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
२६५८ लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घराच्या चाव्या यावेळी देण्यात येणार आहेत. या गृह प्रकल्पाची पाहणी नुकतीच करण्यात आली. यावेळी अभियंता प्रशांत वाघमारे, पथविभागाचे प्रमुख व्ही.जी. कुलकर्णी, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध बावस्कर, विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदुल मुख्य लेखापाल उल्का कळसकर, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता युवराज देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.