नगरपालिका आणि महानगरपालिका नंतर बहुप्रतिक्षित असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा आता उडणार आहे. निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या घोषणेनुसार 50% पेक्षा कमी आरक्षण असलेल्या राज्यातील 12 जिल्हे आणि 125 पंचायतसमिती साठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.त्यानुसार राज्यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता पासून निकाल जाहीर होणार आहे.
निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील 12 जिल्हे व 125 पंचायत समिती यांच्या निवडणुकांच्या घोषणेनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छत्रपती संभाजी नगर, परभणी, धाराशिव, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये निवडणुका होत आहेत. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका घेण्यासाठी अधिक वेळ देण्यात यावा अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
निवडणूक कार्यक्रम
16 जानेवारी ते 21 जानेवारी नामनिर्देशन स्वीकारले जातील.
22 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज यांची छाननी होईल.
27 जानेवारी दुपारी तीन पर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत असेल.
27 जानेवारी दुपारी 3.30 नंतर अंतिम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप
होईल.
5 फेब्रुवारीला सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान होईल.
सात फेब्रुवारीला मतमोजणी सकाळी दहा वाजता पासून होईल.




