सिमेंट, स्टील, पोर्ट, एअरपोर्ट, विज आदि सर्व गोष्टींची मोनोपोली एका माणसाकडे असणाऱ्या गौतम अदानींवर केंद्र सरकारचा वरदहस्त आहे. त्याच्यासाठी रेड कार्पेट आंथरण्याच्या केंद्र सरकारच्या नीतीमुळे हा माणूस अख्या देशाला वेठिस धरेल, असा आक्षेप राज ठाकरे यांनी घेतला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्र परिषदेत मंगळवारी पुन्हा गौतम अदानींवर निशाणा साधला. टाटा,अंबानी, बिर्ला, हिंदुजा यासारखे उद्योगपती ५० ते 100 वर्षानंतर इथपर्यंत येऊन पोहोचले आहे. पण गौतम अदानींनी गेल्या दहा वर्षातच या सर्वांना मागे सोडले आहे. केंद्र सरकारचा त्यांच्यावर वरदहस्त असल्याशिवाय हे शक्य नाही.
आज सात ते आठ विमानतळे एकट्या अदानींना दिले आहेत.
यापैकी केवळ मुंबईचे विमानतळ सोडले तर बाकी सर्व इतरांनी बांधलेली आहेत. सिमेंटच्या व्यवसायामध्ये गौतम पदानी कधीच नव्हते पण त्यांनी क्रमांक एक वर असलेल्या बिर्ला नंतर दुसऱ्या क्रमांकाचे स्थान या व्यवसायात मिळविले आहे. केंद्र सरकारच्या या त्यांच्याबद्दलच्या कार्पेट धोरणावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला.




