टॉप स्टोरी राजकारण

अध्यक्ष ‘पाटील’ हवा, ‘पटेल’ नको! राज ठाकरेंच्या एका ट्विटने महायुतीत खळबळ; राष्ट्रवादीतल्या ‘पॉवर गेम’वर ओढले सणसणीत ताशेरे!

विशेष प्रतिनिधी | मुंबई:महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जो ‘विशाल’ गोंधळ सुरू आहे, त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत तिखट शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) ज्या वेगाने सत्तेची सूत्रे हलली, त्यावर राज ठाकरेंनी ‘मराठी कार्ड’ खेळत थेट निशाणा साधला आहे. “राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोणीही मराठी असावा, पाटील असावा पण पटेल नाही!” असे म्हणत त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या वाढत्या प्रभावावर प्रहार केला आहे.

“राजकारणाचा पार विचका झालाय!”
राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये राज्यातील बदलत्या राजकीय संस्कृतीबद्दल खंत व्यक्त केली. ते म्हणाले:”महाराष्ट्राच्या राजकारणाचा गेल्या काही काळात पार विचका झाला आहे, त्यावर खरंतर भाष्य पण करावं असं वाटत नाही. पण तरीही आज दिवसभर ज्या घडामोडी सुरू आहेत त्यावर बोलावंच लागेल.”

अजितदादांच्या निधनाचा धक्का ताजा असतानाच सत्तेसाठी सुरू झालेली धडपड आणि पदग्रहणाची घाई यावरून त्यांनी नेत्यांच्या संवेदनशून्यतेवर बोट ठेवले आहे.

काय आहे राज ठाकरे यांची ती व्हायरल पोस्ट?
राज ठाकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही पोस्ट शेअर केली आहे. राष्ट्रवादी हा पक्ष ग्रामीण महाराष्ट्रातील रांगड्या मातीतला पक्ष असून त्याचे नेतृत्व परप्रांतीय किंवा अमराठी नेत्याच्या हाती असणे राज ठाकरेंना रुचलेले नाही. प्रफुल्ल पटेल यांच्याकडे असलेली पक्षाची सूत्रे आणि सुनेत्रा पवार यांच्या निवडीतील त्यांची भूमिका यावरच राज ठाकरेंनी हा ‘पाटील विरुद्ध पटेल’ असा वाद छेडला आहे.

राज ठाकरे यांची अधिकृत पोस्ट पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:

👉 राज ठाकरे अधिकृत X (ट्विटर) पोस्ट

पवारांच्या ‘गुगली’नंतर राज ठाकरेंची ‘एन्ट्री’!
आज सकाळी शरद पवारांनीही “मला सुनेत्राच्या शपथविधीची कल्पना नव्हती” असे सांगत अप्रत्यक्षपणे तटकरे आणि पटेल यांच्यावर निशाणा साधला होता. आता राज ठाकरेंनी थेट ‘पटेल’ असा उल्लेख केल्यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजीला उधाण आले आहे. मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करून राज ठाकरेंनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मनातील खदखद बाहेर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *