टॉप स्टोरी महाराष्ट्र

चांदवड- मनमाड महामार्गावर भीषण अपघातात आईसह दोन मुलांचा जागीच मृत्यू

चांदवड शहरातील चांदवड- मनमाड राज्य महामार्गावर भीषण स्वरूपाचा विचित्र अपघात झाला. चांदवड मनमाड महामार्गावर सकाळी अकराच्या सुमारास मनमाडहून चांदवडच्या दिशेने सिमेंटच्या विटा भरलेला ट्रक भरधाव वेगाने येत होता. शहरातील कोतवाल वस्ती, मनमाड रोडवर चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने अचानक ट्रक पलटी झाला. यामध्ये मजूर असलेली महिला तिच्या दोन लहान मुलांसह ट्रकच्या पाठीमागे सिमेंटच्या विटांवर बसलेली होती.

या सिमेंटच्या विटांनी भरलेला ट्रक अपघातात मजूर महिलेसह तिच्या दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात मोठी शोककळा पसरली होती. हा भीषण अपघात झाल्याने चांदवड मनमाड रोडवर काही तास वाहतूक ठप्प झाली होती क्रेनच्या सहायाने अपघातग्रस्त ट्रकला बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी घटनास्थळी चांदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ,पोलीस उपनिरीक्षक नरे,हवालदार स्वप्नील जाधव,सचिन राऊत,प्रदीप आजगे,यांनी घटनास्थळी तातडीचे मदत कार्य करून इतर जखमींना वेळेत उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *