मंगळवारी संध्याकाळी पाच नंतर प्रचार थांबल्यानंतरही उमेदवारांना मतदारांना घरोघरी जाऊन भेटण्याच्या निवडणूक आयोगाच्या मुभेवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्षेप नोंदवला आहे.
प्रचार थांबल्यानंतरही उमेदवारांना मतदारांना भेटू देण्याची मुभा निवडणूक आयोगाने दिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला आरोपाच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. ही मुभा का देण्यात आली? कायदा का बदलण्यात आला? विधानसभा किंवा लोकसभेत का देण्यात आली नाही असे विविध प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला एका पत्र परिषदेत विचारले.
यावेळी त्यांनी ईव्हीएम मशीनला जोडण्यात येणार आहे पाडू मशीन आक्षेप नोंदविला आहे. ही मशीन बसवताना राजकीय पक्षांना गृहीत धरले नाही. ही मशीन का बसविण्यात येत आहे. यावरून निवडणूक आयोगाचे सत्ताधारी पक्षांना पाठबळ असल्याचे दिसून येते. अशी परखड टीका त्यांनी केली आहे.




