टॉप स्टोरी नागपूर

नागपूरमध्ये पैसे वाटपावरून भाजप काँग्रेसमध्ये राडा

नागपुरात भाजपच्या उमेदवार प्रगती अजय पाटील यांच्या प्रचारासाठी काही कार्यकर्त्यांनी मतदारांना रोख रक्कम व साहित्य वाटप केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहिता उल्लंघनाचा गंभीर प्रकार समोर आला आहे.

भाजपचे कार्यकर्ते विवेक सिंग, मानस माळी आणि अन्य दोन जन यांनी गिट्टीखदान परिसरातील आझाद नगर, केरस्टन नगर या भागात प्रचार पत्रकांसह रोख रक्कम वाटत असल्याची घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास समोर आली.

ही माहिती मिळत काँग्रेसचे कार्यकर्ते परिसरात दाखल झाले असता भाजप कार्यकर्ते यांनी तिथून पळ काढला. यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये आचारसंहिता उल्लंघनाची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार भाजप कार्यकर्ते यांनी मतदारांना 1000 रुपये व प्रचार पत्र वाटप केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा तपासून तसेच मतदारांकडून प्रतिक्रिया घेऊन गुन्हेगारांविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *