टॉप स्टोरी नागपूर

जिल्हा न्यायालयात ध्वजारोहण

नागपूर,दि. 26 : प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा न्यायालयात प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश सुराणा यांच्या हस्ते ध्वजरोहण करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव प्रवीण उन्हाळे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे, न्यायाधीश, वकील तसेच अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी पोलीस विभागाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. पोलीस विभागाच्या बँड पथकाने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर केले. यावेळी न्या. दिनेश सुराणा यांनी उपास्थितांना शुभेच्छा दिल्या.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *