धक्कादायक! ‘धुरंधर’ फेम अभिनेता नदीम खानला बलात्काराच्या आरोपाखाली बेड्या; १० वर्षे शरीरसुखाची मागणी आणि दोनदा गर्भपाताचा ‘थारोळा’
मुंबई प्रतिनिधी:चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत संतापजनक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. ‘धुरंधर’ या चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेला प्रसिद्ध अभिनेता नदीम खान याला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात अटक केली आहे. स्वतःच्या घरात काम करणाऱ्या एका ३४ वर्षीय महिलेवर तब्बल एक दशक (१० वर्षे) अत्याचार केल्याचा काळा चेहरा आता समोर आला असून, या घटनेमुळे कलाविश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे ते १० वर्षांचे ‘क्रूर’ वास्तव?
पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत जो धक्कादायक खुलासा केला आहे, तो ऐकून पोलिसांचेही पाय खालची जमीन सरकली. नदीम खानने गेल्या १० वर्षांपासून पीडितेचे सतत लैंगिक शोषण केले. तक्रार केल्यास कामावरून काढून टाकण्याची किंवा जीवे मारण्याची भीती दाखवून त्याने हे ‘पाप’ सुरू ठेवल्याचे पीडितेने म्हटले आहे.
दोनदा बळजबरीने ‘गर्भपात’ केल्याचा गंभीर आरोप
या अमानुष कृत्यामुळे पीडित महिला या काळात दोनदा गरोदर राहिली होती. मात्र, प्रकरण उघडकीस येईल या भीतीने नदीम खानने तिला दोनदा जबरदस्तीने गर्भपात (Abortion) करायला लावला, असा हृदयद्रावक आरोपही महिलेने केला आहे. अखेर या अन्यायाचा कडेलोट झाल्याने पीडितेने हिंमत एकवटून ओशिवरा पोलीस गाठले आणि नदीमचा खरा चेहरा जगासमोर आणला.
पोलीस कारवाई आणि पुढील तपास
पीडित महिलेच्या जबानीवरून ओशिवरा पोलिसांनी नदीम खान विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये (बलात्कार आणि बळजबरीने गर्भपात) गुन्हा दाखल केला असून त्याला तातडीने बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली असून, या प्रकरणामागे आणखी काही धागेदोरे आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
चित्रपटात ‘धुरंधर’ भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे हे ‘अधम’ कृत्य पाहून सर्वसामान्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
—
Deepak Kaitke




