टॉप स्टोरी नागपूर

लोकप्रतिनिधी अन् प्रशासनाच्या सहकार्याने होणार विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात:मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी

७७ वा प्रजासत्ताक दिन मनपा मुख्यालयात साजरा

नागपूर, ता. २६ ः लोकप्रतिनिधी आणि नागपूर महानगरपालिकेचे प्रशासनाच्या सहकार्याने नागपूरमध्ये विकासाच्या नव्या पर्वाला सुरूवात होणार असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.

७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर राष्ट्रध्वज वंदन समारंभात उपस्थितांना संबोधित करीत होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीमती  वसुमना पंत, मुख्य अभियंता श्री. मनोज तालेवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. सदाशिव शेळके, महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. निर्भय जैन, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त डॉ. मेघना वासनकर, उपायुक्त श्री. मंगेश खवले, उपायुक्त श्री. गणेश राठोड, उपायुक्त श्री. राजेश भगत, अधीक्षक अभियंता श्रीमती लिना उपाध्ये, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी यांच्यासह सर्व सहाय्यक आयुक्त व अधिकारी,  इतर कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान, मनपा शाळेतील विद्यार्थी  उपस्थित होते.

अग्निशमन दलाच्या जवानांच्या प्लाटूनच्या जवानांनी आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांचे महानगरपालिकेच्या मुख्यालयात स्वागत केले. यानंतर आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पथसंचलन केले. आयुक्त डॉ. चौधरी यांनी अग्निशमन दलाच्या जवानांकडून  जवानांकडून  सलामी स्वीकारली व प्लाटूनचे निरीक्षण केले.

यानंतर उपस्थितांना संबोधित करताना आयुक्त डॉ . चौधरी म्हणाले,  काही दिवसांपूर्वीच नागपूरच्या मतदारांनी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून लोकशाहीप्रती असलेली निष्ठा व कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेचे काम लोकाभिमुख होण्यास मदत मिळणार आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेले सर्व अधिकारी, कर्मचारी  व लोकशाहीचा महापर्वात खऱ्या अर्थाने यशस्वी करणाऱ्या सर्व जागरुक मतदारांचे आभार आयुक्तांनी यावेळी मानले.

नागपूर महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी  वर्षात नागपूरने विकासाच्या आघाडीवर मोठी झेप घेतली आहे. देशातील एक विकसित शहर म्हणून ओळख निर्माण झाली आहे. लोकांना लोकाभिमुख प्रशासन  प्रदान करण्यासाठी  प्रयत्न करण्यात येत आहे. अमृत योजना १ व २ अंतर्गत शहरातील ज्या भागात पाणी पुरवठा सेवा उपलब्ध नाही. तेथे पाणी पुरवठा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्याठिकाणी  जलवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच पाण्याच्या टाक्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. यातून जास्तीजास्त भागामध्ये २४ बाय ७ पाणी पुरवठा देण्यात येईल, असेही  डॉ. चौधरी यांनी सांगितले.

शहरातील नाग नदी व पोहरा नदीला प्रदूषण निर्मूलन प्रकल्पांची करण्यासाठी महापालिकेतर्फे पावले उचलण्यात आली आहेत.पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत शहरातील  गरीबांना परवाडीणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिका कटिबद्ध असल्याचे सांगून डॉ. चौधरी म्हणाले, या योजनेतून गरिबांना जास्तीत जास्त घरे उपलब्ध करून देण्याचा् प्रयत्न केला जात आहे. नागपूर महानगरपालिकेने आपली बस सेवेचा विस्तार केला आहे. पीएम ई-बसेस अंतर्गत शहरात ५५० बसेस सध्या प्रवाशांच्या सेवेत आहेत. यातील बूहुतेक बसेस या ईबसेस असल्याने शहरातील प्रदूषण नियंत्रित ठेवण्यासाठी फायदा होणार आहे.पर्यावरणपूरक प्रकल्पपर्यावरणपूरक शाश्वत विकासाचे देखील प्रकल्प शहरात राबविण्यात येत आहेत.

भांडेवाडीमध्ये असलेले जुन्या कचर्याचे ढिगारे कमी करण्याचा काम गतीने सुरू आहे. यातून भांडेवाडीतील  ५० एकरपेक्षा जास्त कचर्याचे ढिगारे मुक्त करण्यास मनपा प्रशासन यशस्वी झाले आहे. दररोज ८०० टन कचर्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता् निर्माण केली आहे. यापुढी दररोज एक हजार टन कचर्यावर प्रक्रिया् करणारा महत्वाकांक्षी लवकरच कार्यान्वित होणार असल्याचे त्यांनी सांगितले.मनपाच्या हॉट मिक्स प्लांटच्या मदतीने शहरात दर्जेदार रस्ते निर्माण करण्याचे सुरू आहे.शहरात 100 पेक्षा अधिक आरोग्यवर्धिनी केंद्रे, 6 नव्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू करण्यात येत आहे.

याशिवाय शहरसाच्या सौंदर्यीकरणासाठी रॉक गार्डन, ॲव्हेंचर गार्डन, व्हर्टिंकल  गार्डन असे विविध थीम बेस्ड गार्डनची निर्मिती शहरात केली जात आहे.अग्निशमन दलाच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न सुरू आहे. 14 नवे टेंडर तसेच 70 मीटर उंचीची हायड्रोलिक प्लॅटफॉर्म मुळे शहरातील उंच इमारतींना लागलेल्या आगीवर नियंत्रण आणणे शक्य होणार आहे. यासोबतच अग्निशमन दलाच्या आधुनिक नियंत्रण कक्षाचे निर्माण केली जाणार आहे.

मनपा द्वारे स्मार्ट मित्र –नागरिकांसाठी चॅट बॉट  सुविधेच्या माध्यमातून मालमत्ता कर, मालमत्ता कर निर्धारण सारख्या सुविधा प्रदान करण्यात आली आहे. एआयचा प्रशासनातील वापर, संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले आहे. यातून मनपाचा प्रशासन अधिक पारदर्शक व सुलभ करण्याचा प्रयत्न केला जाते आहे.

मनपा प्रशासनाच्या बळकटीकरणासाठी पावले उचलण्यात आले आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली भरती प्रक्रिया् पूर्ण करण्यात आली आहे. यातून जवळपास 400 कर्मचाऱ्यांची स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून नियुक्ती करण्यात आली आहे.सफाई कर्मचार्यांसाठी घरे उपलब्ध करून देण्यात येत आहे. जवळपास 400 पेक्षा घरे उपलब्ध करून देण्यासाठी कार्यादेश देण्यात आलेले आहे. ऐवजदार कर्मचाऱ्यांना लाड-पागे समितीच्या शिफारशींचा फायदा देण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. यासोबत कर्मचाऱ्यांच्या  हिताचे निर्णय घेण्यात येत आहे.

विद्यार्थ्यांचे नृत्य नाटिका मनपाच्या पन्नालाल देवडीया शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर आधारित नृत्य नाटिका् यावेळी सादर केली. यावेळी राज्यघटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. तसेच कुष्ठ रोग मुक्तीसाठी प्रतिज्ञा घेण्यात आली.प्रारंभी अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत यांनी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांचे मानाचे दुपट्टा व तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी श्री. मनीष सोनी व श्रीमती शुभांगी पोहरे यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. मनीष सोनी यांनी मानले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *