नागपूर दि.७ प्रतिनिधी:राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘तर्री पोहा विथ देवाभाऊ’ या विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, नागपूर महानगरतर्फे हा आगळावेगळा संवाद सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
गुरुवार, ८ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता, सिव्हिल लाईन्स येथील पाम रोडवरील ‘स्वागत लॉन’ येथे संपन्न होणार आहे. शहरातली प्रमुख ५० चौकात स्क्रीन लावून नागरिकांसाठी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे अशी माहिती भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली.
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस यांची मुलाखत लोकप्रिय अभिनेत्री स्पृहा जोशी आणि सुप्रसिद्ध हास्य कलाकार भारत गणेशपुरे घेणार आहेत. नागपूरच्या विकासाचे व्हिजन मांडतानाच, शहराची खास ओळख असलेल्या ‘तर्री-पोहा’चा आस्वाद घेत हा अनौपचारिक गप्पांचा कार्यक्रम रंगणार आहे.




