नागपूर

नागपुरात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी आलेली युवती प्रियकरासोबत बिहारला पळाली:पोलिसांनी शोध घेऊन परत आणले

नागपूर:पोलीस भरती प्रक्रिया पूर्व प्रशिक्षणासाठी आई-वडिलांनी आपल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला नागपूर येथील एका प्रशिक्षण केंद्रात दाखल केले. दरम्यान इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका बिहारमधील युवकाच्या प्रेमात पडून ती युवती बिहारला पळून गेली. आई-वडिलांनी पोलिसात तक्रार दिली, त्यानंतर नागपूर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने तिचा शोध घेऊन मुलीला नागपुरात परत आणले.

तिच्या आई-वडिलांनी तिचा नागपुरातील कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पोलीस प्रशिक्षण अकॅडमीत प्रवेश केला. प्रशिक्षण घेत असताना ती बिहारमधील एका अकरावीच्या अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली.

मागील आठ ते नऊ महिन्यांपासून ते सतत चॅटिंग करत होते. त्यानंतर अल्पवयीन मुलाने तिला बिहारला बोलावले. परंतु जाण्यासाठी पैसे नसल्याने युवतीने आई-वडिलांना अकॅडमीमध्ये पैसे भरायचे आहे असे सांगून ७ हजार रुपये मागितले. आई-वडिलांनी पैसे पाठवल्यानंतर तिने ते पैसे अॅकॅडमीत जमा न करता ती प्रयागराजला पळून गेली.

प्रयागराज येथे अल्पवयीन मुलगा आला आणि दोघेही मुलाच्या गावी बिहार येथे गेले. वृषाली अॅकॅडमीतून न सांगता गेल्याची बाब तेथील प्रशासनाने तिच्या आई-वडिलांना कळवली. तिच्या आई-वडिलांनी कोराडी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या निरीक्षक ललिता तोडासे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक बिहार च्या महागामा येथे गेले. व नंतर सुखरूप नागपूरला आणले.

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *