नागपूर मौदा

धानला परिसरात अवकाळीने दाणादाण..

शेतकरी संकटात; गहू, पीक झोपले

मौदा प्रतिनिधी.. तालुक्यात दोन दिवसांपासून आकाशात ढगांनी गर्दी केली, काल दिनांक 22 फरवरी च्या मध्यरात्री झालेल्या अवकाळीने धानला परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील गहू पिके झोपी गेले व काही शेतकऱ्यांचे ऐन वेळेवर नुकसान होणार?असाही प्रश्न निर्माण झाला आहे, अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात उभ्या गहू, व हरभऱ्यासह इतर पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले, तर वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसाने नुकसान झाले. परिसरात अवकाळी पाऊस पडला आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर असमानी संकट कोसळले. कापूस व सोयाबीनचे नुकसान भरपाई आलेली नसतानाही पुन्हा पावसाने झोडपले

LEAVE A RESPONSE

Your email address will not be published. Required fields are marked *