नागपूर, दि. २३ प्रतिनिधी:प्रेम प्रकरणातून हल्ली अनेक हत्येच्या घटना घडताना दिसत आहे. कधी एकतर्फी प्रेमातून तर कधी विवाहबाह्य संबधातून देखील खुनाच्या घटना घडतात. अशातच आता नागपूरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी नागपूर येथील कळमेश्वर रोडवरील फेटरी गावाच्या परिसरातील एका हॉटेलमध्ये प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणीचे नाव रुचिता भांगे असून, प्रेम प्रकरणातून झालेल्या या हत्येमुळे संपूर्ण परिसरात मोठा हादरा बसला आहे.
हॉटेलमध्येच दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या प्रियकराने चाकूने रुचिताच्या गळ्यावर वार केला. गंभीर जखमी झालेल्या रुचिताचा काही वेळातच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी प्रियकराने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारत घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पोलिसांनी हत्या गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.




