मोदी २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

राजकोट, दि.२७। वृत्तसंस्था पीएम मोदी गुरुवारपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. ते आज सकाळी राजस्थानमधील सीकरमध्ये विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील. दुपारी १२ वाजता सीकरमध्ये जाहीर सभा होणार आहे. यानंतर राजकोटला येतील. पंतप्रधान सौराष्ट्रातील २ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. गांधी नगर राजभवन येथे रात्रीचा मुक्काम असेल. येथे ते भाजपच्या अनेक नेत्यांना भेटणार आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता गांधीनगर येथील महात्मा मंदिरात सेमीकॉन इंडिया परिषदेत सहभागी होतील. हिरासर, राजकोट येथे बांधण्यात आलेल्या ३.०४ किलोमीटर लांब आणि ४५ मीटर रुंद धावपट्टीसह या विमानतळावर एकाच वेळी १४ विमाने पार्क करता येतील. हिरासर, राजकोट येथे बांधण्यात आलेल्या ३.०४ किलोमीटर लांब आणि ४५ मीटर रुंद धावपट्टीसह या विमानतळावर एकाच वेळी १४ विमाने पार्क करता येतील. पीएम मोदी गुरुवारी दुपारी ३.१५ वाजता राजकोट शहरापासून सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करतील. १,४०५ कोटी खचर्ून बांधलेले हे विमानतळ लवकरच सुरू होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *