मुंबई, दि.२७। प्रतिनिधी नामांकित उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. यासंबंधी राज्य सरकारने घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचा पहिला मानाचा पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर करण्यात आला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र भूषण दर्जाचा हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. उद्योगरत्न पुरस्कार यंदापासून देण्यात येणार आहे. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना देण्यात येईल. याशिवाय महिला तसेच मराठी उदयोजक व अन्य एका उद्योजकाला असे तीन पुरसकार देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.