मुंबई, दि.२७। प्रतिनिधी मुंबई महानगर पालिकेच्या सेवेत कार्यरत असलेल्या मागासवर्गीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आयुक्त इकबाल सिंह चहल, संबंधित खात्याचे अन्यायग्रस्त कर्मचारी,अधिकारी आणि कामगार संघटना यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी आज गुरुवार ता.२७ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका एससी, एसटी, व्हिजेएनटी, एसबीसी,ओबीसी एम्प्लॉईज असोसिएशन अध्यक्ष खासदार हरिभाऊ राठोड यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात केली.यावेळी त्यांच्यासोबत सरचिटणीस डॉ.संजय कांबळे बापरेकर उपस्थित होते. यावेळी डॉ.संजय बापरेकर म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेत विविध खात्यात कार्यरत असलेल्या मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आम्ही संघटनेच्यावतीने वेळोवेळी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांना पत्रव्यवहार करीत आलो आहोत.सदर पत्रव्यवहारांची दखल प्रशासनाकडून घेतली जात नसल्याने राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग, भारत सरकार यांच्याकडे आम्हांला दाद मागावी लागते. तथापी, आमच्या असे लक्षात आले आहे की, राष्ट्रीय अनुसूचित आयोगाला परस्पर उत्तर देऊन आमच्या कैफियती दुर्लक्षित केल्या जातात व अनिर्णित ठेवल्या जात आहेत.
महानगरपालिकेमध्ये मागासवर्गीय अधिकाऱ्यांवर तसेच कर्मचाऱ्यांवर दुर्लक्ष करण्यात येत आहे.आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे मागासवर्गीयांच्या प्रश्नांची दखल घेत नाहीत.आम्ही निवेदन दिलेले आहे परंतु मागासवर्गीय कर्मचारी बाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. त्याबाबत नवी दिल्ली येथे देखील आम्ही कळवलेले आहे. मुंबई महानगरपालिका मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना न्याय देत नाही तसेच न्यायालयाने आदेश दिलेले असताना देखील अंमलबजावणी करत नाही. ज्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी होऊनही कारवाही करण्यात आलेली नाही. हि बाब पालिकेच्या लौकिकेला भूषणावह नाही. सह आयुक्त मिलिंद सावंत यांनी देखील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांचे नुकसान केलेले आहे ,हे आमचे दुर्दैव आहे त्यामुळे आम्ही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील भेटणार आहोत. मागासवर्ग कक्षासाठी पूर्णवेळ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. नियम बाहय कामे करून, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमध्ये अडथळे आणणारे तसेच सुमारे २२ वर्षे एकाच ठिकाणी (कॉलेज आस्थापना के.ई.एम. रूगालय) कार्यरत असलेले प्रशासकिय अधिकारी राजेश कुऱ्हाडे यांची पालिका परिपत्रकानुसार अन्यत्र बदली करावी. सेवाजेष्ष्ठ व अर्हताधारक संयुक्त कायदा अधिकारी महिला, संघमित्रा संदानसिंग या केवळ मागासवर्गीय असल्याने त्यांना विधी अधिकारी पदी पदोन्नती न देऊन त्यांच्यावर अन्याय करण्यात आले आहे.त्यांना तात्काळ पदोन्नती मिळावी.अतिरिक्त आयुक्त (प.ऊ) यांच्या अध्यक्षतेखालील पदोन्नती कमिटी मधील निर्णयाची अंमलबजावणी न करून मागासवर्गीय उमेदवार डॉ. यशवंत गभाले यांच्यावर पदोन्नती मध्ये अन्याय अन्याय करण्यात आले आहे.