अमरावती, दि.२८। वृत्तसंस्था महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असे खळबळजनक वक्तव्य श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केले आहे. गुरुवारी रात्री अमरावतीतील एका कार्यक्रमात संभाजी भिडे यांनी हे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे. अमरावतीतील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम येथे गुरुवारी रात्री संभाजी भिडे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संभाजी भिडे यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत वादग्रस्त असे दावे केले. संभाजी भिडे म्हणाले, महात्मा गांधींचे जे वडील म्हणवले जातात ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणले.