५.५ वर्षांत देशातून २.७५ लाख मुले बेपत्ता!

नवी दिल्ली, दि.२८। वृत्तसंस्था देशात गेल्या साडे ५ वर्षांत २ लाख ७५ हजार १२५ मुले बेपत्ता झाले आहेत. सर्वात जास्त मुले मध्य प्रदेशातून बेपत्ता झाले आहेत. तेथून बेपत्ता होणाऱ्या मुलांची संख्या ६१ हजारांहून जास्त आहे. राज्यांतून मिळालेल्या माहितीच्या आधारावर केंद्राच्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.चकित करणारी बाब म्हणजे, बेपत्ता मुलांमध्ये मुलींची संख्या(२१,२८२५) मुलांच्या संख्येच्या तुलनेत(६२,२३७) तिपटीपेक्षा जास्त आहे. केंद्र सरकारने संसदेत याच्याशी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, बेपत्ता मुलांपैकी २.४ लाख मुलांचा शोध घेतला आहे. देशभरात आतापर्यंत ३५ हजार मुले बेपत्ता आहेत. ज्या मुलांचा शोध होऊ शकला नाही, त्यामध्ये मध्य प्रदेश आणि प.बंगालमधील जास्त मुले आहेत.

चाइल्ड हेल्पलाइन बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी काम करते.एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, देशात २०२० मध्ये ६६,०१,२८५ गुन्हे नोंदले आहेत. २०२१ मध्ये ही संख्या ६०,९६,३१० राहिली. म्हणजे, २०२१ मध्ये एकूण गुन्ह्यात १६% वाढ झाली. २०२० मध्ये मुलांवर १,२८,५३१ गुन्हे झाले. २०२१ मध्ये हा आकडा १,४९,४०४ झाला. मुलांबाबत गुन्ह्यांत नोंदलेल्या प्रकरणात सर्वाधिक मध्य प्रदेशात(१९,१७३) आहेत.मुले बेपत्ता होण्याच्या प्रकरणात क्रमांक दोनवर पश्चिम बंगाल आहे. तेथे ४९ हजार मुले बेपत्ता आहेत. अहवालानुसार, ७ राज्य मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये सर्वाधिक मुले बेपत्ता आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *