सातारा, दि.३०। प्रतिनिधी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांना धमकीचा फोन आणि इमेल आला आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस स्थानकामध्ये फोन करणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मराठी वृत्तवाहिन्यांनी याबाबत वृत्त दिले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली होती.
दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या कराड येथील निवासस्थानी धमकीचा मेल आला असून, यात चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्याचे काम सुरू आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे.संभाजी भिडे यांनी महात्मा गांधीजींच्या बद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांबद्दल त्यांना अटकात करण्यात यावी,अशी मागणी चव्हाण यांनी विधिमंडळात केली होती.भिडे यांचे या वक्तव्याचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटत आहेत. दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या येथील निवासस्थानी अज्ञाताने धमकीचा मेल पाठवला असून त्यात चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर चव्हाण यांच्या कार्यालयाच्या वतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू आहे.