शहिदांच्या सन्मानार्थ “मेरी माटी, मेरा देश’ अभियान!

नवी दिल्ली, दि.३०। वृत्तसंस्था नवी दिल्ली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “मन की बात’मध्ये उत्तर भारतात आलेला पूर आणि भूस्खलनाचा उल्लेख केला. श्रावण महिना सुरु आहे, त्यामुळे सर्वत्र हर्षोल्हास आणि भक्तीमय वातावरण आहे. देशातील कला, संस्कृती यांचा उल्लेख करुन पंतप्रधान मोदींनी चित्रकलेबद्दल सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या चित्राचाही उल्लेख मोदींनी यावेळी केला. शहीदांना नमन करणारे “मेरी माटी, मेरा देश’ अभियान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीदांच्या सन्मानार्थ “मेरी माटी, मेरा देश’ अभियान (चशीळ चरींळ चशीर ऊशीह) सुरु करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, देशात सध्या अमृत महोत्सावाची चर्चा आहे. १५ ऑगस्ट जवळ येत आहे. शहीद वीर आणि वीरांगणांना सन्मानित करण्यासाठी, त्यांना सन्मान देण्यासाठी “मेरी माटी, मेरा देश’ अभियान सुरु केले जाईल. या अभियानातून देशभरातील शहीदांना नमन केले जाईल. त्यांचे स्मरण केले जाईल. देशातील लाखो ग्राम पंचायतींमध्ये विशेष शिलालेख स्थापन केले जातील. “मन की बात’मधून मोदींनी विविध अभियानांची घोषणा केली. ते म्हणाले, देशाच्या विविध भागातून “अमृत कलश यात्रा’ काढली जाणार आहे. देशाच्या गावागावातून ही यात्रा निघेल.

कानाकोपऱ्यातून ७५०० कलशांमध्ये माती गोळा करुन ही यात्रा देशाची राजधानी दिल्लीत पोहचेल. या यात्रेत देशाच्या विविध भागातून रोपे आणली जातील. ७५०० कलशांमधून आणलेली माती आणि रोपांची लागवड नॅशनल वॉर मेमोरियल येथील अमृत वाटिकेत केली जाईल. पंतप्रधान मोदी म्हणाले, यमुनेसह अनेक नद्यांना पूर आला. यामुळे अनेक नागरिकांना त्रास सहन करावा लागला. डोंगराळ भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या. याआधी देशाच्या पश्चिमेकडे काही दिवसांपूर्वी पूर्व गुजरात भागात बिपरजॉय चक्रीवादळ आले होते. या सर्व नैसर्गिक आपत्तींमध्ये आपण सर्व देशवासी एकत्र होतो. सर्वांनी सामूहिक प्रयत्नांची ताकद काय असते ते दाखवून दिले आहे. स्थानिक नागरिक, आमचे एनडीआरएफ जवान, स्थानिक प्रशासन यांनी दिवस-रात्र परिश्रम करुन या सर्व समस्यांचा सामना केला.कोणत्याही आपत्तीचा सामना करताना आमचे सामर्थ्य आणि यंत्रणांची भूमिका महत्त्वाची ठरते. त्यासोबतच आमची संवेदनशीलता आणि एकमेकांचा हात हातात ठेवून समस्येला भिडण्याची आमची वृत्ती ही देखील तेवढीच महत्त्वाची ठरते. सर्वजन हितायची ही भावना भारताची ओळख आणि ताकद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *