कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची गळफास घेत आत्महत्या

मुंबई, दि.२। प्रतिनिधी सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन त्यांनी आपले आयुष्य संपवले. नितीन देसाई यांनी आत्महत्येपूर्वी काही व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. काल रात्री उशिरा ते दिल्लीहून मुंबईला विमानाने आले, त्यानंतर रेकॉर्ड केलेल्या व्हॉईस क्लीपमध्ये चार बिझनेसमनची नावं असल्याचा दावा केला जात आहे. कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉईस नोट रेकॉर्ड केल्याचं समोर आलं आहे.

यामध्ये चार व्यावसायिकांच्या नावाचा उल्लेख असल्याचे सांगण्यात येत आहे. देसाई काल रात्री दिल्लीहून मुंबईला विमानाने आले. रात्री अडीच वाजता गाडीने ते कर्जतमधील एनडी स्टुडिओला आले. तेव्हाच ते तिथल्या मॅनेजरशी बोलले. तुला उद्या सकाळी मी व्हॉईस रेकॉर्डर देतो. मॅनेजरने व्हॉईस रेकॉर्डरसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. सकाळी नितीन देसाई गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले. त्यावेळी हा व्हॉईस रेकॉर्डर त्यांच्या मृतदेहाच्या बाजूलाच होता. पोलिसांनी तो ताब्यात घेऊन तपास सुरु केला आहे. त्यामध्ये काही व्हॉईस नोट असून चार व्यावसायिकांनी आपल्याला कसं छळलं, आर्थिक व्यवहारानंतर कसा दबाव आणला, हे ध्वनिमुद्रित केल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *