चालू महिन्यातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार : इच्छुकांच्या आशा पल्लवीत

मुंबई, दि.२। प्रतिनिधी राज्य मंत्री मंडळाचा पुन्हा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. हा विस्तार याच महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्येच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या वेळी मंत्री मंडळ विस्तारात महायुतीच्या आणखी आमदारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे गेल्यावेळी प्रतीक्षेत असलेल्या आमदारांच्या पुन्हा एकदा मंत्रीपदाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या वेळी शिंदे गटाच्या आमदारांना संधी दिली जाणार का? असा प्रश्न आहे. आता होणाऱ्या मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्र्यांचीही नेमणूक होणार आहे.

शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना यात संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रीपदाची अपेक्षा लावून बसलेले आहेत. शिंदे- फडणवीस सकारच्या कार्यकाळात सरकार स्थापनेनंतर आता पर्यंत दोन वेळा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे. यात दुसऱ्या वेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या आमदारांचा मंत्रिमंडळा समावेश झाल्यामुळे शिंदे गटाचे तसेच भाजपचेही आमदार नाराज झाले होते.च्या आशा पल्लवीत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *