नवी दिल्ली, दि.२। वृत्तसंस्था एनडीएच्या खासदारांना रक्षाबंधनादरम्यान मुस्लिम महिलांना भेटण्यास सांगितले आहे. पंतप्रधानांनी खासदारांना रक्षाबंधनादरम्यान कार्यक्रम आयोजित करण्यास आणि मुस्लिम महिलांपर्यंत पोहोचण्यास सांगितले. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, सोमवारी पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील एनडीएच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदींनी या सूचना दिल्या. बैठकीला उपस्थित काही खासदारांनी सांगितले की, पीएम मोदींनी समाजातील प्रत्येक घटकाशी संपर्क साधण्याचा आग्रह धरला. या बैठकीत पीएम मोदींनी तिहेरी तलाकवर बंदी घालण्याच्या निर्णयावरही चर्चा केली. या निर्णयामुळे मुस्लिम महिलांना मोठा दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तिहेरी तलाकवर बंदी घालण्यासाठी संसदेने २०१९ मध्ये एक विधेयक मंजूर केले.