मुंबई, दि.२१। प्रतिनिधी मुंबई विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलेली सिनेट निवडणूक अचानक स्थगित केल्याने विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यावरूनच विरोधकांकडून सरकारला जाब विचारला जात आहे. यातच सोमवारी युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी विद्यापीठात तब्बल चार तास ठिय्या आंदोलन करत विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना घेराव घातला. त्यामुळे आता सिनेट निवडणुकीवरून चांगलच राजकारण तापलं आहे. मागील आठवड्यात ९ ऑगस्टला मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणूक जाहीर करण्यात आल्या होती. मात्र, गुरुवारी रात्री अचानक ही निवडणूक स्थगित करण्यात आली. अचानक ही निवडणूक स्थगित करण्यात आल्याने राजकीय वतर्ुळात चर्चांना उधाण आले.
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीवरून ठाकरे गट-मनसे-भाजप आमनेसाम ने ठाकले आहेत. अशातच सोमवारी चार युवासेनेच्या सिनेटच्या उमेदवारांनी मुंबई विद्यापीठात ठाण मांडून बसत निवडणूक कार्यक्रमानुसार आमच्या अर्जांची छाननी करा आणि निवडणुका घ्या, अशी मागणी केली. मात्र, विद्यापीठ प्रशासनाकडून निवडणूक स्थगित करण्यात आल्याने पुढील निर्णय येईपर्यंत असे करता येणार नाही, अशी भूमिका विद्यापीठाकडून घेण्यात आली. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवरुन चांगलच राजकारण तापलं असून आता युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी उपकुलसचिवांना घेराव घालत ही निवडणूक जाहीर करण्यात आलेल्या तारखांनुसार घ्या, आमच्या अर्जाची छाननी करा, अशी मागणी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. दरम्यान, आता मुंबई विद्यापीठ पुढे काय निर्णय घेतं, ते पाहणं महत्वाचं असणार आहे.