जालना, दि.३। प्रतिनिधी जालना जिल्ह्यात झालेल्या घटनेनंतर आता सरकारने कारवाईला सुरुवात केली आहे. गृहमंत्रालयाकडून जालना जिल्ह्याचे एसपी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, जालना येथील पोलिस अधीक्षक पदाचा पदभार आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांच्याकडे देण्यात आला आहे.