बंगळुरू, दि.३। वृत्तसंस्था सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रोने शनिवारी आपली पहिली सौर मोहीम सुरू केली. झडङत-उ५७ च्या दङ आवृत्ती रॉकेटने ६३ मिनिटांच्या प्रवासात आदित्य ङ१ ला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवले होते. ही पृथ्वीची लंबवतर्ुळाकार कक्षा आहे. याच्या एका दिवसानंतर आदित्य ङ१ ची कक्षा वाढवली जात आहे. कक्षा वाढवण्यासाठी इस्रोचे शास्त्रज्ञ काही काळ अवकाशयानाचे थ्रस्टर किंवा इंजिन फायर करतील. आदित्य स्पेसक्राफ्ट पृथ्वीपासून १५ लाख किमी दूर असलेल्या लॅग्रेंज पॉइंट-१ वर सुमारे ४ महिन्यांनंतर पोहोचेल. या ठिकाणी सूर्य आणि पृथ्वीचे गुरुत्वाकर्षणाचे गुणोत्तर असे आहे की येथे अंतराळयान स्थापित केले जाऊ शकते. विशेष म्हणजे या बिंदूवर ग्रहणाचा प्रभाव पडत नाही, त्यामुळे येथून सूर्यावर अधिक चांगले संशोधन करता येईल.