सुनील केदार यांच्या मतदारसंघावर देशमुख कुटुंबाचा दावा !!

काँग्रेस (Congress) नेते सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या सावनेर मतदारसंघावर (Savner Vidhan Sabha Matadarsangh) देशमुख कुटुंबानं (Deshmukh Family) दावा केला आहे. काँग्रेसचे माजी उप्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख (Ranjeet Deshmukh) यांचा मुलगा अमोल देशमुख (Amol Deshmukh) यांनी सावनेरमधून पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.

काँग्रेसचे दिग्गज नेते सुनील केदार यांच्या सावनेर मतदारसंघावर काँग्रेसमधूनच वेगळी दावेदारी करण्यात आली आहे. आणि ही दावेदारी दुसऱ्या- तिसऱ्या कुणी नाही, तर केदार घराण्याशी जुनं राजकीय वैर असलेल्या देशमुख कुटुंबातून करण्यात आली आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशुमख यांचे चिरींजीव डॉ. अमोल देशमुख यांनी सावनेर मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागत, मी केदार – देशमुख या अत्यंत जुन्या राजकीय वादावर पडदा टाकून सुनील केदार यांच्यापुढे मैत्रीचा हात ठेवल्याचं मत व्यक्त केलं आहे. सुनील केदार यांच्यासोबत पूर्वी स्थानिक निवडणुकांमध्ये मी सहकार्यानं काम केलं आहे.

राजकारणात एकेकाळी केदार – देशमुख वाद होता. मात्र मी केदार यांच्यासमोर मैत्रीचा हात दिला आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्येही त्यांना मदत केली आहे. अशा रीतीने अनेक पातळ्यांवर सुनील केदार यांच्यासोबत काम केलं आहे. बँक घोटाळ्यात दोषी सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे सध्या तरी ते निवडणूक लढवण्यास अपात्र आहेत. पुढे काय होईल, हे देखील अद्याप अस्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी मला लहान भावासारखं मानून काँग्रेस पक्षाचा सहकारी मानून मोठ्या मनानं संधी द्यावी, अशी अपेक्षा असल्याचं अमोल देशमुख म्हणाले आहेत.

जेव्हा केव्हा संधी मिळेल, सुनील केदार यांना भेटणार आणि बोलणार असंही अमोल देशमुख म्हणाले आहेत. दरम्यान, सावनेर आणि देशमुख कुटुंबाचंही जुनं नातं असून माझे वडील रणजीत देशमुख यांचा तो जुना मतदारसंघ आहे. वडिलांचे अनेक कार्यकर्ते आजही सावनेरमध्ये असून माझ्या सोबत काम करणारे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं तिथे आहेत. त्यामुळे सावनेर मतदार संघावर मला माझा हक्क वाटतो, पक्षश्रेष्ठी न्याय करतील, अशी अपेक्षा असल्याचंही अमोल देशमुख म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *