भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. कानपूर येथे हा सामना सुरु असून पहिल्या दिवसअखेर बांगलादेशने 3 विकेट्स गमावत 107 धावा केल्या. पहिल्याच दिवेशी या सामन्यावर पावसाचे वर्चस्व राहिले. त्यामुळे फक्त 35 षटकांचा खेळ झाला. विशेष म्हणजे भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने घेतलेल्या एका निर्णयामुळे तब्बल 60 वर्षांनंतर कानपूरमध्ये असं पहिल्यांदाच घडलं आहे.
भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरपासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर सुरू आहे. पण सर्वातआधी या मैदानावर रोहित शर्माने घेतलेला एक निर्णय चर्चेत आला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून बांगलादेशला गोलंदाजीसाठी आमंत्रित केले. कानपूरच्या ग्रीन पार्क मैदानावर नाणेफेक जिंकून कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याची गेल्या 60 वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे. याआधी 1964 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारतीय कर्णधार मन्सूर अली खान पतौडीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो सामना अनिर्णीत राहिला होता.
आणखी एक नवीन विक्रम
गेल्या 9 वर्षांत भारताने मायदेशात कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. 2015 मध्ये जेव्हा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. योगायोगाने हा सामनाही अनिर्णित राहिला. बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. यासह रोहित शर्मा कसोटी मालिकेत प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल न करणारा गेल्या 5 वर्षांतील पहिला कर्णधार ठरला आहे.
टीम इंडिया आघाडीवर-
सध्याच्या मालिकेत टीम इंडिया 1-0 ने पुढे आहे. भारताने पहिला सामना 280 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. दुसरा सामना जिंकणे देखील भारतीय संघासाठी महत्त्वाचे आहे. भारत-बांगलादेशचा दुसरा कसोटी सामन्या अनिर्णित राहिल्यास याचा फटका टीम इंडियाला बसण्याची शक्यता आहे.