रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्ग; कोल्हापूर जिल्ह्यात 30 जानेवारीपर्यंत ‘या’ गावांमध्ये जमीन संपादनाचे पैसे वाटपासाठी शिबीर

रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) कोल्हापूर जिल्ह्यातील चार तालुक्यातून भूसंपादन करण्यात आले आहे. हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, करवीर आणि हातकणंगले अशा चार तालुक्यांमधील गावांमधून जाणार आहे. त्यामुळे महामार्गासाठी आंबा ते चौकाकपर्यंत जमीन संपादनाचे कामकाज सुरु आहे. त्याबाबतचे निवाडे पूर्ण झाल्याने शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी 19 जानेवारीपासून गावनिहाय शिबिर घेतली जात आहेत.

या पार्श्वभूमीवर नुकसानभरपाईच्या रकमेचे वाटप करताना (Nagpur-Ratnagiri National Highway) आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन, माहिती प्राधिकारी तथा भूसंपादनच्या उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *