पहाटेच्या शपथविधीवर मी कधीही बोलणार नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची (Sharad Pawar) खेळी होती, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी एबीपी माझाशी बोलताना केला होता. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. “त्यावेळी मी स्वत: म्हटलेलं होतं की तो विषय मी कदापि काढणार नाही,” असं म्हणत अजित पवारांनी यावर कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला. तसंच आपण उपमुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याची कोणतीही चर्चा झाली नाही, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. ते जालन्यात बोलत होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *