मुंबई, 27 जानेवारी : छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टवर 45 इलेक्ट्रिक वेईकल्सची (ईव्ही) पहिली तुकडी दाखल झाली. असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोकॅम) द्वारे त्यांच्या 14 व्या असोकॅम कॉन्फरन्स अॅण्ड अवॉर्ड्स फॉर सिव्हिल एव्हिएशनमध्ये शाश्वत प्रयत्नांसाठी ‘बेस्ट सस्टेनेबल एअरपोर्ट ऑफ द इअर’ पुरस्कारासह मान्यता मिळाल्यानंतर घोषणा करण्यात आली. जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सीएसएमआयएने 45 ईव्ही सादर केल्या आहेत. कार्बन प्रमाण कमी करण्यासाठी आणि शाश्वत वाहतूकीला प्रोत्साहन देण्यासाठी विमानतळाच्या बांधिलकीचा हा एक भाग आहे. सीएसएमआयएचा 2029 पर्यंत त्याच्या नेट झिरो मिशनचा भाग म्हणून सर्व इंधन-शक्तीवर चालणारी वाहने इलेक्ट्रिक वाहनांसह बदलण्याचा मानस आहे.
सीएसएमआयए पुढील आर्थिक वर्षात आणखी 60 ईव्ही तैनात करण्याची योजना आखत आहे, ज्यामध्ये रुग्णवाहिका, फॉरवर्ड कमांड पोस्ट, सुरक्षा व एअरसाइड ऑपरेशन्स आणि मेन्टेनन्स यूटिलिटी वाहनांचा समावेश आहे. हा उपक्रम गतीशीलतेमध्ये जीवाश्म इंधन जाळल्यामुळे जवळपास 25 टक्के हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यामध्ये मदत करेल. सर्व प्रवाशांना जागतिक दर्जाचा अनुभव आणि आरामदायी प्रवास देताना हे प्रयत्न कार्यक्षमतेने सुरू आहेत.