प्रजासत्ताक दिनी तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू

चंद्रपूर, 27 जानेवारी : गुरुवारी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम आटोपून सायंकाळी तीन शाळेकरी मित्र गडचांदूर शहरालगतच्या अल्ट्राटेक सिमेंट कंपनीने खोदलेल्या एका खोल खड्डयात पोहण्यासाठी गेले. अंधारात पाण्याचा अंदाज न आल्याने या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. आज, शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने एकाच खळबळ उडाली.

काल गुरुवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मुले पोहायला गेली होती. खड्डयाजवळ मुलांचे कपडे, चपला, जोडे होते. त्यावरून ही घटना उघडकीस आली. दर्शन बच्चा शंकर, पारस गौरदिपे व अर्जून सिंह अशी मृतांची नावे आहे. तिघेही अल्ट्राटेक कंपनी वसाहतीतील कर्मचाऱ्यांची मुले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *