मुंबई प्रतिनिधी : ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारी येथे उपस्थित राहिले.ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थ्यांना आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. त्याचबरोबर परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांचे त्यांनी आभारही मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील.तणावमुक्त,खेळात रमणारा,वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष.या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा संदेश दिला. तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे,तणावाचा सामना कसा करावा,पालकांनी विद्यार्थांशी नक्की कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेला भेट…..
मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शिंदे आपल्या शाळेत आले होते.त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता.पंतप्रधानांच्या संवादानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी शाळा क्रमांक २३ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले,देशालाच एक कुटंब मानून, त्याच्या प्रमुखाच्या नात्यानं प्रचंड कामाच्या व्यापातही परिक्षा याविषयावर सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे पंतप्रधान आपल्याला लाभले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील.