नागपूर : येत्या १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प २०२३ सादर करण्यात येणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करण्याच्या दोन दिवस अगोदरच देशातील सर्व बँकांचे कर्मचारी संपावर जाणार आहेत. त्यानुसार, बँकेचे कर्मचारी ३० आणि ३१ जानेवारीला म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी संपावर जाणार आहेत. बँक कर्मचारी संपावर गेल्यास बँक शाखेच्या कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
चार दिवस बँका राहणार
बंद बॅक कर्मचाऱ्यांनी ३० आणि ३१ जानेवारी रोजी संप पुकारण्यात आला आहे. मात्र, त्यापूर्वी महिन्याचा चौथा आठवडा असल्याने बँकांना शनिवार आणि रविवार सुट्टी असते. त्यामुळे २८ व २९ जानेवारीलाही बँका बंद असतील. परिणामी संपाचे दोन दिवस आणि विकेंडचे दोन दिवस असे मिळून एकूण चार दिवस बँका बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी बँक कर्मचारी संपावर जाणार आहे. बँक कर्मचाऱ्यांची संघटना युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या बैठकीत संपावर जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, बँक कर्मचाऱ्यांनी ३० आणि ३१ जानेवारी रोजी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.
बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या काय?
बँक कर्मचारी युनियनने बँकिंग कामकाज पाच दिवसांचे करावे. राष्ट्रीय पेन्शन योजना संपुष्टात आणावी पगार वाढीबाबतच्या वाटाघाटी सुरू कराव्यात बँकांमधील सर्व कॅडरमध्ये भरती प्रक्रिया लागू करावी यांसह आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.