तुर्कस्तानच्या भूकंपात आतापर्यंत ४३०० मृत्यू

अंकारा, दि.०७। वृत्तसंस्था गेल्या २४ तासांतील सलग चार भुकंपांनी तुकर्ी, सिरीया हादरला आहे. तुर्कस्तानमध्ये मंगळवारी पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रतारिश्टर स्केलवर ५.९ इतकी मोजली गेली. याआधी सोमवारी तुर्कस्तानमध्ये भूकंपाचे तीन जोरदार धक्के जाणवले. यापैकी पहिला भूकंप पहाटे ४ वाजता ७.८ रिश्टर स्केलचा होता. यानंतर ७.५ आणि ६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपामुळे येथे युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अनेक लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

तुर्कस्तानमध्ये अवघ्या १० तासांत भूकंपाचे चार मोठे धक्के बसल्याने मोठा हाहाकार उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, तुकर्ी आणि सीरियामध्ये किमान ४००० लोक मारले गेले आहेत आणि २०,००० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. १० शहरांमधील १,७०० हून अधिक इमारतींचे नुकसान झाले. सीरियामध्ये किमान ७८३ लोक मारले गेले आणि ६३९ जखमी झाले. इस्रायल आणि लेबनॉनमध्येही अनेक मृत्यूची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच तुकर्ीमध्ये ७ दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. भूकंपग्रस्त देशातील जनतेला मदत करण्यासाठी भारत यूरोपियन यूनियनच्या सोबत मदत पाठवणार आहे. भारत पाठवत असलेल्या विशेष मदतीत प्रशिक्षित डॉग स्क्वॉड आणि आवश्यक उपकरणांसह १०० कर्मचारी असलेली च्या २ टीम पाठवणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *