बंगळूरु । ऋषभ शेट्टी दिग्दर्शित आणि अभिनीत “कांतारा’ या चित्रपटाने संपूर्ण देशभरात धुमाकूळ घातला. मूळ कन्नड भाषेतील या चित्रपटाला मिळणारा उत्स्फुर्त प्रतिसाद पाहिल्यानंतर निर्मात्यांनी त्याचं इतर भाषांमध्ये डबिंग केलं. कन्नडशिवाय इतर भाषांमध्येही या चित्रपटाने जोरदार कमाई केली. सोशल मीडियावर या चित्रपटाची वाहवा झाली. आता कांतारा या चित्रपटाला ऑस्कर या प्रतिष्ठित पुरस्काराच्या नामांकनासाठी पाठवलं गेलं आहे. ऑस्कर नॉमिनेशनसाठी निर्मात्यांकडून अर्ज दाखल करण्यात आला आहे. होमेबल प्रॉडक्शन्सचे संस्थापक विजय किरगंदुर यांनी ही माहिती दिली. एका मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाले, आम्ही कांतारासाठी ऑस्करमध्ये अर्ज दाखल केला आहे. अद्याप नॉमिनेशन फायनल झालेलं नाही. कांतारा त्याच्या दमदार कथेच्या जोरावर जगभरातील प्रेक्षकांना आकर्षित करेल असा आम्हाला विेशास आहे.