अदानी समूहाचे जोरदार कमबॅक

मुंबई, दि.०७। प्रतिनिधी प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी समूहाच्या अनेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये मागच्या आठवड्याभरापासून पडझड सुरु होती. आज मंगळवारी ही पडछड थांबली. वरपळ थळश्रारी पासून वरपळ झेीीं पर्यंत आठ शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळाली, तर दोन कंपन्यांचे शेअरचे भाव उतरले. वरपळ एपींशीिीळीशी या शेअरचा तर सकाळपासूनच चढता आलेख पाहायला मिळाला. तब्बल १४.२८ टक्क्यांची वाढ या शेअरमध्ये पाहायला मिळाली. २४ जानेवारी रोजी अमेरिकेतील हिंडेनबर्ग या संस्थेने अदानी समूहाच्या शेअर्समधील फेरफारबाबतचा अहवाल सार्वजनिक केल्यानंतर शेअर बाजारात भूकंप आला होता. १ फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर होणार होता, त्या पोर्शभूमीवर शेअर बाजारावर काहीसा तणाव पाहायला मिळाला. मात्र अदाणी समूहाने एफपीओची गुंतवणूक परत करण्याचा घेतलेला निर्णय असो किंवा एसबीआय कर्जाबाबत दिलेली माहिती, त्यामुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा ओशासक चित्र पाहायला मिळाले.

अदानी एंटरप्रायझेसच्या शेअरचे भाव १४.२८ टक्क्यांनी वाढून १,७९७ रुपयांवर पोहोचले. अदानी ट्रान्समिशन ५ टक्क्यांनी वाढून १,३२४.४५४ वर पोहोचला. अदानी पोर्ट्स आणि विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये ५.७९ टक्क्यांची वाढ होऊन ५७७.६५ रुपयांवर हा शेअर गेला. तर अदाणी ग्रीन एनर्जीमध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ झाली. हा शेअर ९१३.७० वर पोहोचला. अदाणी विल्मरचा शेअर ४.९९ टक्क्यांनी वाढून ३९९.४० वर पोहोचला. एसीसी शेअरमध्ये ३.१३ टक्क्यांची वाढ होऊन हा शेअर २,०३१.२० रुपयांवर पोहोचला. अंबूजा सिमेंट्स ३.२० टक्क्यांनी वाढून ३९१.६० रुपयांवर पोहोचला. तर माध्यम क्षेत्रात अदाणींनी काही काळापूर्वी प्रवेश करुन एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला स्वतःच्या ताब्यात घेतले होते. या वाहिनीचे शेअर्समध्ये देखील ५ टक्क्यांची वाढ होऊन २२५.३५ रुपयांवर शेअर पोहोचला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *