जे सरकार “३७०’ हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर भगवा लावण्यास परवानगी देईल का?

नवी दिल्ली, दि.०७। वृत्तसंस्था जे सरकार कलम ३७० हटवू शकतं ते सरकार शिवनेरीवर कायमचा भगवा लावण्यास परवानगी देईल का? असा रोखठोक सवाल आज राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत उपस्थित केला. पुरातत्व खात्याच्या नियमांमुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज फडकवला जात नाही. याबाबत खासदार अमोल कोल्हे यांनी आज लोकसभेत मुद्दा उपस्थित केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आभार ठरावावर बोलताना खासदार अमोल कोल्हे यांनी सरकारच्या काही नियमांवर प्रश्न उपस्थित केले. ब्रिटिशकालीन कायद्यात काही बदल करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले.

संपूर्ण देशाची प्रेरणा असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ असणाऱ्या किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावता येत नसल्याकडे खासदार अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधले. जे सरकार ३७० हटवू शकते. तेच सरकार पुरात्व खात्याच्या जुन्या कायद्यात बदल करून किल्ले शिवनेरीवर कायमस्वरुपी भगवा ध्वज लावू शकत नाही का, असा प्रश्न खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला. बैलगाडी शर्यतीवर असलेल्या बंदीवर त्यांनी लक्ष वेधले. गोवंशाच्या वाढीसाठी असलेल्या बैलाचा समावेश वाघ, सिंह, अस्वल या सारख्या वन्य प्राण्यांच्या यादीत आहे. बीफ निर्यातीत भारताने १० व्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर उसळण घेतली. त्यामुळे भारताविरोधात असलेले, आंतरराष्ट्रीय समुदायाशी संबंधित गट जलीकट्टू, बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यासाठी वारंवार कोर्टात धाव घेत असल्याचा आरोप डॉ. कोल्हे यांनी केला. सरकारने बैलाला छेप मधून वगळण्याची मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *