नवी दिल्ली, दि.०७। वृत्तसंस्था उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ धर्मगुरू नव्हे तर ठग असल्याची तिखट टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली आहे. राहुल यांनी सोमवारी दिल्लीतील सामाजिक संघटनांशी संवाद साधताना ही टीका केली. कॉन्स्टिट्युशन क्लबमध्ये झालेल्या या बैठकीत स्वराज इंडियाचे प्रमुख योगेंद्र यादवही उपस्थित होते. बैठकीत राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील स्थितीवर प्रश्न करण्यात आला होता. त्यावर राहुल म्हणाले -उत्तर प्रदेशात कुणीही हिंसाचाराला प्रोत्साहन देत नाही. पण मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या भाषेमुळे धर्मगुरू म्हणता येत नाही. केवळ भगवा घातल्यामुळे कुणी धर्मगुरू होत नाही. माफ करा. पण आदित्यनाथ कोणतेही धार्मिक नेते म्हणजे धर्मगुरू नाहीत. ते एक सामान्य ठग आहेत. भाजप उत्तर प्रदेशात अधर्माचा प्रचार प्रसार करत आहे.
राहुल यांना यावेळी यूपीतील धार्मिक वादळाविषयी छेडण्यात आले. त्यावर ते म्हणाले – उत्तर प्रदेशात धर्माचे वादळ नाही. मी इस्लाम वाचले. ख्रिश्चन धर्मही वाचला. बौद्ध धर्माचाही अभ्यास केला. हिंदू धर्माचीही मला जवळून जाण आहे. कोणताही धर्म हिंसाचार पसरवण्याचा उपदेश करत नाही. एखाद्या तपश्चर्या बंद केली की तो संभ्रमाच्या स्थितीत पोहोचतो. योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वीच काही वृत्तवाहिन्यांना मुलाखत दिली होती. त्यात ते म्हणाले होते – विरोधी पक्षांचे राहुल गांधींसारखे नेते भाजपचे काम सोपे करतात. ते खरेच भाजपसाठी पोषख वातावरण तयार करतात. काँग्रेस १९४७ पासून देशात जाती-धर्माच्या नावाने फूट पाडत आहे. यावेळी योगींना भारत जोडो यात्रेमुअळे राहुल यांच्या प्रतिमेला काही फायदा झाला काय? असा प्रश्न केला असता ते म्हणाले – राहुल गांधी यांनी आपली नकारात्मकता सोडली तर काँग्रेसला फायदा होईल. नकारात्मकता त्यांच्या यशावर पाणी फेरते.