नवी दिल्ली, दि.०७। प्रतिनिधी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावालाच्या कबुली जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपीने हत्येच्या दिवशी घडलेल्या घटनाक्रमांचा खुलासा केला आहे. तसेच श्रद्धा वालकरची हत्या केल्यानंतर मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली हे देखील आफताबने पोलिसांना सांगितले आहे. श्रद्धा हत्याकांडात नव्यानं मोठा खुलासा झाला आहे.
पोलिसांनी आरोपी आफताबवर श्रद्धाची हाडे ग्राइंडरमध्ये बारीक करून हाडांच्या पावडरची विल्हेवाट लावल्याचा आरोप केला आहे. आरोपपत्रातील आफताबचा कबुलीजबाब पाहता त्याने हत्येनंतर तीन ते चार महिन्यांनी श्रद्धाचा चेहरा विद्रूप करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे आणि त्यानंतर धडाची विल्हेवाट लावली. न्यायालयाने मंगळवारी आरोपी आफताब अमीन पूनावालाविरुद्ध दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. कोर्टाने आरोपपत्राची प्रत आफताबच्या वकिलालाही दिली आहे.