रत्नागिरी, दि.०७। प्रतिनिधी रत्नागिरी, ७ फेब्रुवारी : प्रस्तावित नाणार रिफायनरी प्रकल्पावरुन प्रकरण तापण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प होणारच अशी घोषणा केली होती. त्यानंतर एका पत्राकराचा अपघातात संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. काल (सोमवारी) राजापूर येथे झालेल्या थार आणि दुचाकी अपघातात जखमी झालेले पत्रकार शशिकांत वारीसे यांचा आज सकाळी मृत्यू झाला. मात्र, या अपघातात आता वेगळी बाजू समोर येऊ लागली आहे. थार चालक पंढरीनाथ आंबेरकर यांच्यावर राजापूर पोलीस स्थानकात ३०४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.