अदानी हरिश्चंद्र निघाले तर आम्ही त्यांना हार घालू

नवी दिल्ली, दि.०८। वृत्तसंस्था राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर राज्यसभेत सुरू असलेल्या चर्चेत आज विरोधी पक्षनेते व काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कथित आर्थिक व्यवहारांबदद्ल व त्यांच्या आणि मोदी सरकारच्या संबंधांबद्दल संयुक्त संसदीय समितीतङ्र्के (जेपीसी) चौकशी करण्याच्या मागणीचा पुनरूच्चार केला. अदानी यांचे नाव घेऊन खर्गेंनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच त्यांच्यावरही आरोपांच्या ङ्कैरी झाडल्या. १२ लाख कोटींवर कब्जा करून हा माणूस (अदानी) कसा काय बसला आहे. यावर जेपीसी चौकशी करा. हा घोटाळेबाज हरिश्चंद्र शुद्ध निघाला तर आम्ही त्याला हार घालू. दरम्यान खर्गे यांनी शेरोशायरी करताच राज्यसभाध्यक्षांनीही, विरोधकांनी आत्मपरीक्षण करावे, या अर्थाचा गालीबचा शेर एकविला ! राज्यसभाध्यक्ष जगदीप धनखर यांनी खर्गे यांना आरोपांऐवजी पुरावे सादर करण्यास सांगितले.

भाजपनेही राहुल गांधी यांचे मेहुणे रॉबर्ट वाड्रा यांचा मुद्दा उपस्थित करत खर्गे यांच्यावर जोरदार प्रहार केला. खर्गे म्हणाले की आज सर्वत्र जे लोक द्वेष पसरवत आहेत त्यांच्याबद्दल पंतप्रधान गप्प का बसले आहेत. तुम्ही (मोदी-भाजप) सगळ्यांना घाबरवता पण द्वेष पसरवणाèयांना का घाबरवत नाही. तुमची एक नजर पडली तरी अशा लोकांना समजेल की त्यांना तिकीट मिळणार नाही, ते गप्प बसतील. तुम्ही गप्प बसले आहात त्यामुळेच ही परिस्थिती झाली आहे. खर्गे यांनी जातीय आणि धार्मिक भेदभावाचाही मुद्दा उपस्थित केला. धर्म-जात-भाषेच्या नावावर द्वेष सोडा आणि भारत एक करा. खर्गे म्हणाले की ‘या इसमाला (अदानी) सरकारकडूनच प्रोत्साहन मिळाले आहे. त्याला बँकांनी ८२ हजार कोटी कर्ज दिले. गुजरातमधील एका शेतकèयाला ३१ पैसे थकबाकीसाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळाले नाही हे मोदीजींना माहीत असेल. अदानींचे धोरण म्हणजे पैसा आमचा, बंदर, विमानतळेही आमची. तुम्ही एका अदानीला ८२ हजार कोटी बहाल केले . खर्गे यांनी मोदी आणि केंद्र सरकारवर अदानींवरून अनेक गंभीर आरोप करताच सभापती धनखड यांनी आक्षेप घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *